वारकर्याचा उपचार न मिळाल्याने हृदयविकाराने मृत्यू  
फलटण दि. २ 
वारीच्या वाटेवर अनेक सेवा/सुविधा उपलब्ध असल्या तरी प्रारब्ध बदलण्याची क्षमता त्याच्यात नसल्याचेच आज वारीत चालणाऱ्या वारकऱ्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात त्याला वाचविण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरल्याने मान्यच करावे लागेल. #phaltannews

वारकरी

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली  सोहळ्यात पालखीच्या पुढे चाललेल्या अनेक वारकर्‍यांच्या जथ्यातील एक वारकरी शंकरराव माणिकराव शिंदे (वय ६०,रा.परंजगाव, जि. परभणी) यांना प्रवासातच जोराचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांनी अनेक वाहनांना थांबवून सदर हृदय रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र गर्दीत थांबणे शक्य नसल्याने वाहन चालकांचा नाईलाज होताना दिसत होते, मात्र सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उलट्या दिशेने जाऊन अडचण समजावून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून गाडीतील सर्वांना खाली उतरवून सदर रुग्णाला गाडीत घेऊन लोणंद कडे धाव घेतली


दरम्यान त्यांचे स्वीय सहाय्यक भाऊ कापसे यांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल देऊन बोलावून घेतले तरडगाव ते सरदेचा ओढा दरम्यान रुग्णाला अध्यक्षांच्या गाडीत आणि त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, भाऊ कापसे यांनी या रुग्णालयाला पूर्व कल्पना दिली असल्याने दाखल होताच उपचार सुरु झाले मात्र यश आले नाही. वारकरी मंडळींनी तातडीने केलेल्या मदतीबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. #Sanjevraje_Naik-Nimbakarसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत केल्यानंतर फलटणकडे परतत असताना गर्दी पाहुन चौकशी करण्याच्या निर्णयामुळे एका हृदय रुग्णाला मदत करता आली परंतू त्याला वाचवू न शकल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांनी खंत व्यक्त केली. #marathinews


1 Comments

Ask Me Any Queries.

Post a comment

Ask Me Any Queries.

Previous Post Next Post