आज दिनांक २/७/२०१९ रोजी मा ना गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या विधान भवनाच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीतील चर्चेचे विषय, #marathinews
१) नीरा-देवघर प्रकल्पातील गावडेवाडी उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्याबाबत २) माण खटाव मतदारसंघातील उत्तर माण भागातील 35 गावांना आंधळी तलावातून कटापूर उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळणे बाबत व उपसा सिंचन योजनेत होता मान्यता मिळणे बाबत ३) टेंभू योजनेतून स्वतंत्र उपसा सिंचन योजना राबवून खटाव माण भागाला पाणी मिळणे बाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्रावर ही बैठक आयोजित केली होती या बैठकीचे आयोजन करुन सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. #ranjitsinh_naik-nimbalkar
त्यानुसार सदर बैठक संपन्न झाली वरील तीन योजनांसाठी आवश्यक असेल तो निधी देण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अन्सारी व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना दिले या निर्णयामुळे मान खटाव तालुक्यातील चौसष्ट गावांना लवकरच आंधळी धरणातून व 35 गावे व टेंभू योजनेतून खटाव माण तालुक्यातील 35 गावांना शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याचा लाभ होणार आहे. #jaykumar_gore
याबरोबरच झालेल्या निर्णयामुळे अतिरिक्त ७ टीएमसी हे माढा लोकसभा मतदारसंघाला मिळणार असून याद्वारे नीरा देवधर प्रकल्पातील गावडेवाडी उपसा सिंचन योजना पूर्वीच मंजूर झाली मंजूर असून याद्वारे धोम बलकवडी कॅनॉल मध्ये पाणी दिल्यास खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त चार महिने पाणी उपलब्ध होऊ शकते हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच नीरा देवधर धरणातील पाणी सांगोला व पंढरपूर देणे अत्यंत गरजेचे अशा प्रकारचे सादरीकरण केले तसेच आमदार जयकुमार गोरे यांनी वरील दोन्ही योजनातून 68 गावांना माण खटाव तालुक्यातील गावांना लाभ होणार व दुष्काळी कलंक कायमचा पुसला जाणार अशी आग्रहाची विनंती केली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या योजनेसाठी लागणारा सर्व निधी देण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिली काही ही राजकीय मंडळींनी हा तिढा निर्माण करून शेतकऱ्यांमध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न केला होता त्याला थारा दिला जाणार नाही. #nira_devghar
वरील योजना लवकरत लवकर मार्गी लागली दिसेल असे जलसंपदामंत्री यांनी खासदार निंबाळकर यांच्या शिष्टमंडळास सांगितले या बैठकीस सांगोलाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख ,फलटणचे जयकुमार शिंद,प्रशांत कोरेगावकर ,कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, कार्यकारी अभियंता घोगरे साहेब ,कोले साहेब, सांगलीचे गुणाले साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते. #phaltan #satara
If you should be opting for finest contents like me, just visit this blog site daily because it provides the feature contents, thanks.
ReplyDeleteclick for more info
What are the best casinos to play in 2021?
ReplyDeleteWhich casinos offer slots? — Casino Sites. worrione Best nba매니아 casino sites are https://deccasino.com/review/merit-casino/ those that allow players to try a game from anywhere. The casinosites.one most common online https://septcasino.com/review/merit-casino/ slots